पोस्ट केलेला व्हिडीओ पाहुन ते धावले अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी! 

मनोज साखरे
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

नाईक यांच्या नातेवाईकांनी तात्काळ औरंगाबादकडे धाव घेतली. आम्ही त्वरीत मुंबईहुन निघतोय. आमचे औरंगाबादेत कोणीही नाही, आता तूम्हीच एक भाऊ समजून सर्वतोपरी काळजी घ्या. असे त्यांनी सांगितले. याला लगेचच ओ देत गोर्डे व इतरांनी मदत केली. डोक्‍याला इजा झाल्याने नाईक यांना आतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. 

औरंगाबाद - अपघात झाला की जखमींची तात्काळ मदत करणे हा माणुसकीचा धर्म, पण मदत मागुनही मदतीऐवजी त्याच अपघाताचे व्हिडीओचित्रण करुन वॉटसऍपवर व्हायरल करणे म्हणजे माणुसकीचा झरा आटत चाललाय. असेच बाब म्हणावी लागेल. परंतु वॉटसऍपवर पोस्ट झालेल्या व्हिडीओ पाहुन माणुसकी जीवंत असणारी माणंसही असतात. त्याचेच उदाहरण औरंगाबादेतील आकाशवाणी ते सेव्हनहिल रस्त्यावर पाहायला मिळाले. 

पाच नोव्हेंबरला सत्यम (वय 21) या दुचाकीस्वाराची धडक महेश नाईक (वय 58 रा. मुंबई) यांना बसली. यात नाईक यांच्या डोके, कपाळ व मानेला गंभीर इजा झाली. तसेच सत्यमही जखमी झाला. गंभीर जखमी असलेले नाईक रस्त्यावर मदतीची याचना करीत होते. मात्र त्यावेळी काही जण मोबाईलवर छायाचित्रण करीत होते.

मदतीसाठी कुणाही पुढे येत नव्हते. अपघात व जखमी अवस्थेत पडलेल्यांचे चित्रीकरण एका ग्रूपवर व्हायरल झाले. त्या ग्रुपमधील श्रीमंत गोर्डे पाटील व ऍड. अंजली कुलकर्णी, एस. रवी कुमार लोखंडे यांनी ही बाब समजली. यानंतर त्यांनी नाईक यांच्या अपघाताची माहिती मुंबईतील नातेवाईकांशी संपर्क करुन कळविली.

त्यानंतर श्रीमंत गोर्डे पाटील, अंजली कुलकर्णी एका रुग्णालयात गेले. तर लोखंडे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी अपघातस्थळी आले. एका रिक्षाचालकाला विनंती करून त्यांनी जखमी महेश भालचंद्र नाईक व भाले यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत परिस्थितीची माहिती गोर्डे पाटील व इतर नाईक यांच्या मुंबईतील नातेवाईकांना देत होते. 

हेही वाचा : अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे आयुष्यावर दरोडा! 
आता तुम्हीच भाऊ... 
नाईक यांच्या नातेवाईकांनी तात्काळ औरंगाबादकडे धाव घेतली. आम्ही त्वरीत मुंबईहुन निघतोय. आमचे औरंगाबादेत कोणीही नाही, आता तूम्हीच एक भाऊ समजून सर्वतोपरी काळजी घ्या. असे त्यांनी सांगितले. याला लगेचच ओ देत गोर्डे व इतरांनी मदत केली. डोक्‍याला इजा झाल्याने नाईक यांना आतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. 

त्यांनी मानले आभार.. 
शुक्रवारी (ता. सहा) सकाळी नाईक थोडेफार बोलुन ओळखतही होते. नाईक यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. तेव्हा ओळख नसतानाही देवासारखे आपण धावलात. उपचारासाठी नेत काळजी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. अशा शब्दात नातेवाईकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या अपघाताची नोंद जिन्सी पोलिस ठाण्यात करण्यात आली.  

हेही वाचा : कोणत्याही चौकशीसाठी तयार एन्काऊंटरनंतर हैद्राबाद पोलिसांची पत्रकार परिषद. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After watching the video posted, they ran to help the casualty!