अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे आयुष्यावर दरोडा!

मनोज साखरे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

अनेक तरुण, गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती अशा ड्रग्जच्या आहारी जात आहेत. खासकरून ड्रग्जची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून चोरट्या मार्गाने हातोहात ते पुरविले जात आहेत. गांजा, व्हाईटनर, पेट्रोलची नशा सर्रास होते; परंतु त्यापेक्षाही अधिकतम पातळीवर नायट्रोसन या हायपोटोनिक ड्रग्जची चटक नशेखोरांना लागली. नायट्रोसनची मागणी होत असल्यामुळे त्याच्या अवैध विक्रीतही वाढ होत आहे. अशा मादक, अमली द्रव्यांच्या विक्रीवर आळा घालण्याची गरज आहे. 

औरंगाबाद - भाई, बटन है क्‍या?, म्यॉंऊ म्यॉंऊ है क्‍या असे कोड वर्ड वापरून नवखे तरुण, नशेखोर बटन अर्थात नायट्रोसनचे सेवन करीत आहेत. विविध अमली पदार्थांच्या सेवनानंतर गुन्हेगारी कृत्यांत भर पडत असून, असे व्यसन केलेल्या तरुणांच्या कृत्यांत पाचजणांचे बळी गेल्याचे आठ दिवसांत समोर आले आहे. नशापानातून अनेक निष्पापांचे बळी जात असून, तस्करांविरुद्ध कारवाईचा "अंमल' कठोर करण्याची गरज आहे. 

 दारू, गांजा, व्हाईटनरसोबतच बंदी असलेल्या ड्रग्जचा व्यसनासाठी वापर केला जात आहे. यात बटन नावाने परिचित असलेल्या नशाकारक पदार्थाचे सेवन केल्याने नशेच्या भरात ठार मारण्यापर्यंत काहींची मजल गेलेली आहे. औरंगाबाद शहरात आठ दिवसांत पाचजणांचा खून झाला. हे खून नशापानानंतर झाल्याचे समोर आले आहे.

विशेषत: अनेक तरुण, गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती अशा ड्रग्जच्या आहारी जात आहेत. खासकरून ड्रग्जची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून चोरट्या मार्गाने हातोहात ते पुरविले जात आहेत. गांजा, व्हाईटनर, पेट्रोलची नशा सर्रास होते; परंतु त्यापेक्षाही अधिकतम पातळीवर नायट्रोसन या हायपोटोनिक ड्रग्जची चटक नशेखोरांना लागली. नायट्रोसनची मागणी होत असल्यामुळे त्याच्या अवैध विक्रीतही वाढ होत आहे. अशा मादक, अमली द्रव्यांच्या विक्रीवर आळा घालण्याची गरज आहे. 

हेही वाचा : तेजासाला करायचे होते मॉडेलिंगमध्ये करीअर पण त्यापुर्वीच... 
 

ड्रग्जचे अपाय 

  • ड्रग्ज विविधप्रकारे सेवन केले जाते. यात काही ड्रग्ज मान्यताप्राप्त आहेत, तर काहींचा वापर करणेच बेकायदा आहे. ड्रग्ज पदार्थांचा दुरुपयोग अनेक शारीरिक व्याधींना निमंत्रण देतो. अनेकवेळा अतिसेवनानेही मृत्यू संभवतो. 
  • ड्रग्ज शरीरात तरतरी आणते. अनेकवेळा खेळाडू अशा ड्रग्जचा दुरुपयोग करतात. या ड्रग्जने क्रीडाक्षेत्राला ग्रासल्याची अनेक उदाहरणे डोपिंग चाचणीतून समोर आली आहेत. 
  • जोपर्यंत ड्रग्जचा परिणाम असतो, तोपर्यंत ताजेतवाने वाटते; पण उत्तेजकाचा प्रभाव कमी झाला, की शरीर क्षीण होते. सतत ड्रग्ज घेतल्याने नकारात्मक परिणाम होतात. 
  • मानसिक समस्याग्रस्त रुग्णांना "नायट्रोसन' दिले जाते. लवकर जाग येणे, निद्रानाश होणे, या स्थितीत नायट्रोसन हे शामक म्हणून काम करते; परंतु नशेखोरीसाठी याचा दुरुपयोग जास्त होतो. 
  • याचे सेवन केल्यानंतर चेतासंस्थेवर अपाय होतात. नैराश्‍य, झोपाळूपणा, उदासीनता, डोकेदुखी, भोवळ, स्मृती कमजोरी अशा समस्याही उद्‌भवतात, असे तज्ज्ज्ञ सांगतात. 

ही आहेत नार्कोटिक्‍स ड्रग्ज 

कोकेन, मेथाएम्फेटामिन, एम्फेटामिन, रिटालिन, साइलर्ट, इन्हेलेंट या ड्रग्जचे सेवन अपायकारक असून, यामुळे मानसिक बदल होऊ शकतात. अतिसेवनाने शरीरातील ऑक्‍सिजन कमी होतो. त्यामुळे हृदयाचे कार्य अतिवेगवान होते. लिव्हर, किडनीसंबंधित समस्यांसह विविध अपाय होऊ शकतात. 

"कोड वर्ड'वर चालते विक्री 

विविध ड्रग्जची टोपणनावे आहेत. त्या-त्या भागात विक्रीनुसार अशी नावे दिली जातात. त्या पदार्थांची छुपी विक्री केली जाते. उदाहरण म्हणजे नायट्रोसनचे टोपणनाव "बटन' आहे. अवैध विक्रीदरम्यान ""भाई, बटन है क्‍या?'' असे विचारून विक्रेत्याची खात्री केली जाते. "कोड वर्ड' उच्चारल्याने खात्रीचा ग्राहक असल्याचे समजून ग्राहकाला तत्काळ हे ड्रग्ज दिले जाते. 
 

व्यसनातून झालेल्या अलीकडील घटना 
 

18 सप्टेंबर : खर्रा न दिल्याने मित्रांनीच वेटर असलेल्या शफीखान (रा. अरब खिडकी, बेगमपुरा) या तरुणाचा खून केला. 
24 सप्टेंबर : नशेच्या गोळ्यांसाठी पैशांची मागणी केल्यानंतर ते न दिल्याने सय्यद जमीर सय्यद जहीर (वय 25, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) या तरुणाचा चाकूने भोसकून खून. 
25 सप्टेंबर : नशाकारक गोळ्या सेवन करून अमोल बोरडे या संशयिताने भगवान बोराडे, कमलबाई बोराडे, दिनकर बोराडे यांचा केला खून. 

हेही वाचा : या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाच लाखांची खंडणी! 

हेही वाचा : एका तपानंतर लागला तो पोलिसांच्या गळाला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many victims go through addiction