औरंगाबादेत एटीएसची पुन्हा कारवाई

मनोज साखरे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

औरंगाबादेतील सचिन अंदुरे याला अटक केल्यानंतर तपास यंत्रणा कसून झडतीसत्र राबवित आहे. त्यांनी मंगळवारी पहाटे देवळाईत एका घराची झडती घेतली हे घर सचिन अंदुरेच्या चुलत भावाचे असल्यासाचे समजते.
 

औरंगाबाद : औरंगाबादेतील सचिन अंदुरे याला अटक केल्यानंतर तपास यंत्रणा कसून झडतीसत्र राबवित आहे. त्यांनी मंगळवारी पहाटे देवळाईत एका घराची झडती घेतली हे घर सचिन अंदुरेच्या चुलत भावाचे असल्यासाचे समजते.

‌सूत्रांनी माहिती दिली की एटीएसच्या पथकाने देवळाई भागात पहाटे कारवाईबाबतची कल्पना स्थानिक पोलिसांना दिली. स्थानिक पोलिसानी या कारवाईबाबत दुजोरा दिला आहे.

बीडबायपास परिसरातील देवळाईच्या मनजीत प्राइड येथे एका घरात झडती घेण्यात आली तिथे एटीएसला नेमके काय हाती लागले हे स्पष्ट कळू शकले नाही. दरम्यान तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत अाहे याला मात्र, अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

Web Title: Again ATS take action in Aurangabad