मुद्रा कर्जासाठी पुन्हा बोगस कोटेशन!   

mudra
mudra

औरंगाबाद : बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेसाठी बोगस कोटेशन पाठवून बॅंका आणि सर्वसामान्यांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारण्यात येत आहे. शहरातील बॅंक ऑफ बडोदातून 41 लाभार्थ्यांनी 47 लाख रुपयांचे मुद्रा कर्ज घेऊन पोबारा केला आहे. त्यानंतरही बोगस कोटेशन देण्याचे सत्र थांबत नाही. आंध्रा बॅंकेतही एका ग्राहकाने बोगस कोटेशन दाखल करीत कर्जाची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी याची तक्रार थेट पोलिस आयुक्‍तांकडे केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 4) घडला. 

आंध्रा बॅंकेच्या क्रेडिट अधिकाऱ्यांना काही दिवसांपासून कर्जमंजुरीसाठी एक नागरिक त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार कोटेशन आणि परिपूर्ण कागदपत्रे नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी हे मुद्रा कर्ज प्रकरण मंजूर केले नाही. यामुळे या कर्जाची मागणी करणाऱ्यांनी राजकीय वजन वापरत त्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला. त्यानंतरही अधिकारी कर्ज मंजूर करीत नसल्यामुळे त्यांच्यावर जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. यामुळे या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी थेट पोलिस आयुक्‍तालय गाठत पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे तक्रार केली. 

आंध्रा बॅंकेचे क्रेडिट ऑफिसर माझ्याकडे आले होते. त्यांनी त्रासाबद्दल माहिती सांगितली. यासह त्यांनी कर्ज का रद्द केले, याची सविस्तर माहिती मला दिली. जोपर्यंत परफेक्‍ट कागदपत्रे मिळत नाहीत, तोपर्यंत बॅंकेकडून कर्ज मिळू शकत नाही. याप्रकरणी कुणीही अनावश्‍यक बॅंकेवर दडपण आणण्याचा प्रयत्न करेल, त्यावर कारवाई करण्यात येईल. बॅंक व्यवस्थापकांना लक्ष्य करत बॅंकेवर दडपशाही करून कर्ज मिळवता येत नाही. या प्रकरणात कारवाई होणार आहे. 
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्‍त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com