नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; वजीराबाद हादरले                 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नांदेड : शहराच्या वजीराबाद परिसरातील दिलीपसिंग कॉलनी भागात बुधवारी (ता. 4) मध्यरात्री दोन गटात वाद हाेऊन गोळीबार झाला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी शेख अन्वर अली खान आणि प्रदीप रावत रे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूस जप्त केले.

वजीराबाद पोलिसांची कारवाई - घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, डीवायएसपी अभिजीत फस्के, पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी भेट देऊन तेथील स्थानिक नागरिकांना धीर दिला. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू होती 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again firing in nanded city