लातूर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध करा, निलंगेकर यांचे आवाहन

विकास गाढवे
Thursday, 19 November 2020

मराठवाडा पदवीधर मतदार संघात भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना मताधिक्‍य द्यावे आणि लातूर जिल्‍हा भाजपाचा बालेकिल्ला असल्‍याचे पुन्‍हा एकदा सिद्ध करावे, असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे निवडणूक प्रमुख तथा माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.

लातूर  : मराठवाडा पदवीधर मतदार संघात भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना मताधिक्‍य द्यावे आणि लातूर जिल्‍हा भाजपाचा बालेकिल्ला असल्‍याचे पुन्‍हा एकदा सिद्ध करावे, असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे निवडणूक प्रमुख तथा माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. श्री. बोराळकर यांच्‍या प्रचारार्थ मंगळवारी (ता. १८) येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कोविड चाचणी नाही तर शिक्षकांना शाळेत 'एन्ट्री' नाही 

उमेदवार बोराळकर, जिल्‍हाध्‍यक्ष आमदार रमेशअप्‍पा कराड, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, आमदार अभिमन्‍यु पवार, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्‍यक्ष सुधाकर भालेराव, पदवीधर निवडणूक जिल्‍हा प्रमुख अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेचे अध्‍यक्ष राहुल केंद्रे, शहरजिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे, प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी, नागनाथअण्‍णा निडवदे, दत्ता कुलकर्णी, गणेश हाके, शैलेश लाहोटी, माजी आमदार विनायकराव पाटील, अॅड. दिग्विजय काथवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार कराड यांनी सरकार विरोधात पदवीधरांमध्ये मोठा असंतोष असल्याने जिल्ह्यातील भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत असल्याने बोराळकर आमदार होणारच असल्याचे सांगितले. या वेळी श्री. देशमुख, राळकर, आमदार पवार, अरविंद पाटील निलंगेकर, श्री. भालेराव, श्री. हाके व संजय दोरवे यांनी बोराळकर यांच्‍या विजयासाठी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना महत्त्वपूर्ण सूचना केल्‍या. चंद्रकांत कातळे यांनी सूत्रसंचालन केले. मनिष बंडेवार यांनी आभार मानले.

 

Edited - Ganesh Pitekar

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again Prove Latur District Stronghold Of BJP, Sambhaji Patil Nilangekar's Appeal