aurangabad
aurangabad

भाजप नगरसेवकांचे आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन

औरंगाबाद : जयभवानीनगर नाल्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. गतवर्षी पावसाळ्यात एकाचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केले नाही. त्यात बुधवारी ( ता.तीन ) रात्री याच नाल्यात पडून एक जण जखमी झाल्यामुळे भाजप नगरसेवकांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांची समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान राज्यमंत्री अतुल सावे यांनी याविषयावर आयुक्तांची भेट घेतली.

महापालिकेने मागील वर्षी जय भवानीनगरातील नाल्याचे बांधकाम हाती घेतले होते परंतु काम अर्धवट झाल्यानंतर मध्येच बंद केले. परिणामी नाल्याच्या एका बाजूकडून दुसरीकडे जाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे त्यातच एक नागरिक बुधवारी नाल्यात पडून जखमी झाला.  त्यामुळे संतापलेल्या भाजप नगरसेवकांनी गुरुवारी आयुक्त झालं गाठून त्यात हे आंदोलन सुरू केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com