पाण्यासाठी आमदार चिकटगावकरांचे उपोषण 

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून वैजापूर, गंगापूर तालुक्‍यासाठी नांदूर मधमेश्‍वर कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे, यामागणीसाठी सोमवारी (ता. 20) आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर उपोषणास बसले आहेत. 

पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याने लोक रस्त्यावर उतरत आहेत. त्यांच्या भावनांचा विचार न झाल्यास वेगवेगळ्या मार्गान आंदोलने होतील, असा इशारा आता पक्ष, संघटना देत आहेत. दरम्यान, गंगापूर, वैजापुर तालुक्‍याची स्थिती पाण्यापायी अंत्यत वाईट झालेली आहे. याठिकाणी दोनशे टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तालुक्‍यातील मन्याड धरण व शेजारील गळमोडी धरणातील जलसाठा हा आठवडाभरच पुरेल, एवढेच पाणी शिल्लक आहे. वेळीच पाणी उपलब्ध करून न दिल्यास नागरिकांना जनावरांसह स्थलांतर करावे लागेल, अशी भिती व्यक्‍त करण्यात येत आहे.

पाण्याबाबत तीन दिवसापूर्वीच मागणी करूनही त्याकडे दूर्लक्ष केल्याने सोमवारी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोरच आमदार चिकटगावकर उपोषणास बसले आहेत. यावेळी अभय चिकटगावकर यांच्यासह तालुक्‍यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com