मराठा आरक्षणासाठी रिसनगाव येथे 50 युवकांचे मुंडन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची मागणी आहे रिसनगाव येथे जाहीर सभा घेऊन आपल्या भावना शासनापर्यंत कळवण्यात आल्या. यावेळी युवकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवावे कसल्याही प्रकारची गंभीर स्वरूपाचे कार्य करू नये असे हे आव्हान केले यावेळेस छावाचे माऊली पाटील पवार, शिवसेनेचे मिलिंद पवार, जगदीश कदम बालाजी नळगे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोहा : सबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज दहा दिवसांपासून लोहा तालुक्यात अनेक मराठी बांधवांनी आपल्या परीने मराठी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ते आंदोलन, बैठा सत्याग्रह मोर्चे या माध्यमातून न्याय मागणी करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून रिसनगावातील बुधवारी (ता.१) पन्नास युवकांनी मुंडन केले व शासनाचा निषेध केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची मागणी आहे रिसनगाव येथे जाहीर सभा घेऊन आपल्या भावना शासनापर्यंत कळवण्यात आल्या. यावेळी युवकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवावे कसल्याही प्रकारची गंभीर स्वरूपाचे कार्य करू नये असे हे आव्हान केले यावेळेस छावाचे माऊली पाटील पवार, शिवसेनेचे मिलिंद पवार, जगदीश कदम बालाजी नळगे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच गावातील मराठा युवा कार्यकर्ते चेतन पाटील पवार, कैलास पवार, बिभिषन पवार, दत्ता पवार, जयवंत पवार, सुरेश रेणापुरे, विठ्ठल पवार, हनमंत पवार, माणिक पवार, इब्राहीम शेख, रोहीदास पवार, बालाजी पवार, माधव पवार, धोडीबा पवार, बालाजी पवार, भिमराव पवार आदी असंख्य युवकांनी मुंडन करून आपला निषेध व्यक्त केला. यावेळेस माळाकोळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हा निषेध कार्यक्रम शांततेत पार पडला.

Web Title: agitation in jalna for Maratha reservation