परभणी जिल्हा कचेरीसमोर कोतवालांचे मुंडन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

परभणी : कोतवालांच्या कामबंद आंदोलनाची  दखल 30 दिवसांनंतरही घेतली नसल्याने सोमवारी (ता. 24) त्यांनी मुंडन आंदोलन केले. सर्वांनीच आंदोलनस्थळी मुंडन करीत मुख्यमंत्र्याविरूद्ध घोषणा देत शासनाचा निषेध नोंदविला. 

चतुर्थ श्रेणीत समाविष्ठ करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील कोतवालांच्या संघटनांनी 6 डिसेंबरपासून जिल्हा कचेरीसमोर कामबंद आंदोलन सुरू केले. दरम्यान, मागण्यांकडे लक्ष वेण्यासाठी आंदोलकांना 17 डिसेंबरला भिकमागो आंदोलन केले. तरीही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून सोमवारी कोतवालांनी वेगळे मुंडन आंदोलन केले.

कोतवालांनी न्हावी यांना आंदोलनस्थळी बोलावून घेतले. प्रत्येकाने मुंडन करीत शासनाचा निषेध व्यक्त केला. शासन वेळकाढूपणा करीत असल्याचे नमूद करीत आंदोलकांनी या धोरणाविरूद्ध घोषणाबाजी केली. या माध्यमातून तरी कोतवालांच्या भावना शासनापर्यंत पोहचाव्यात, असा आशावाद आंदोलकांनी व्यक्त केला. ज्ञानेश्वर बुलबुले, संतोष रानगीरे, माणिक गिरी, रामेश्वर कनले, हनुमान राऊत, दत्ता पांचाळ, मुंजा जुंबडे, रामजी शिरसेवाड, दत्तोपंत वाघमारे यांच्यासह जिल्हाभरातील कोतवाल संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.  
 
Web Title: agitation by kotwal in from\nt of Parbhani district office