परभणीत मराठा समाजाचे धरणे आंदोलन सुरु

कैलास चव्हाण
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के शुल्काची अंमलबजावणी करावी, आंदोलनात आत्मबलीदान देणाऱ्या युवकांच्या कुटूंबीयांचे पुनवर्सन करावे, कै.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास एक हजार कोटी निधी जाहीर करावा अशा मागण्यांसाठी मंगळवारी (ता.14) ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

परभणी - मराठा आरक्षण आंदोलनादरम्याण मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी (ता.14) पासून परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

ता.15 ऑगस्टला पालकमंत्र्याऐवजी अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहन करावे अशी मागणी मराठा समाजाने केली असून मराठा आंदोलनातील युवकांवर दाखल झालेले गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घ्यावे, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आंदोलनात ताब्यात घेतलेली वाहने परत करावीत, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के शुल्काची अंमलबजावणी करावी, आंदोलनात आत्मबलीदान देणाऱ्या युवकांच्या कुटूंबीयांचे पुनवर्सन करावे, कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास एक हजार कोटी निधी जाहीर करावा अशा मागण्यांसाठी मंगळवारी (ता.14) ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The Agitation of the Maratha community in Parbhani