सरपंच, ग्रामसेवकांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात पिरबावड्यात उपोषण

fulambri
fulambri

फुलंब्री (औरंगाबाद) : तालुक्यातील पिरबावडा येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या घरकुल व वैयक्तीक सिंचन विहारीच्या कामात सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केला. या प्रकरणी योग्य चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बुधवारी (ता. 3) आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

फुलंब्री पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांना 26 सप्टेंबरला पिरबावडा येथील घरकुल व वैयक्तिक लाभाच्या विहीर योजनेत सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक आदींनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला अशी तक्रार ग्रामस्थांनी 26 सप्टेंबरला दिली होती. पिरबावडा येथील पंतप्रधान आवाज योजना, रमाई आवास योजना, व वैयक्तीक सिंचन विहिरीच्या कामात सरपंच ग्रामसेवक व रोजगार सेवक अदिनी संगनमत करुन भ्रष्टाचार केला या बाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदीना संबंधीत भ्रष्टाचाराच्या विषयी निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान 19 सप्टेंबरला पिरबावडा गावात जाऊन अनेक घरकुल लाभार्थीचे व संबंधित मजुरांचे जवाब नोंविण्यात आले. त्यामुळे 25 सप्टेंबरचे उपोषण स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी धिम्या गतीने सुरु आहे. घरकुल व वैयक्तीक लाभाच्या विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषी असलेल्या अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी चौकशी समिती नेमून काही प्रमाणत चौकशीचे जवाब नोंदविले. झालेल्या चौकशीचा अहवाल अद्यापही तक्रारदारांना देण्यात आला नसल्याने आज रोजी नईमखान पठाण, कचरू गाडेकर, संतोष उमके, अजिनाथ बोकील, भाऊसाहेब गाडेकर, जयराम गाडेकर, शेख वसीम, शिवाजी गाडेकर, खलील मुलतानी, इलियास मुलतानी आदींनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणकर्त्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अमले यांनी भेट घेतली आहे. मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंत या उपोषण कर्त्यांना कुठलेही ठोस आश्वासन मिळाले नसल्यामुळे आमरण उपोषण सुरूच होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com