संगमनेरवर यापुढे तिसऱ्या डोळयाची नजर !

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात येणार; रविवारी होणार लोकार्पण

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर शहरावर यापुढे तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. बावीस सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांद्वारे शहराच्या चौकाचौकात लक्ष ठेवले जाईल. संगमनेर पोलीस व राजस्थान युवक मंडळाने पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या तिसरा डोळा उपक्रमाचे रविवारी लोकर्पण होणार आहे.

गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशाने संगमनेर शहरात महत्वाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याने गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख आहेत.

लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. दुचाकी चोरी, महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने ओरबाडणे यासह चोऱ्यांच्या घटना रोखण्यासाठी सी.सी.टी.व्ही कॅमेरे महत्वाचे ठरतील. संगमनेर शहरातील चावडी चौक, गवंडीपूरा, सय्यदबाबा चौक, तेलीखुंट, तिनबत्ती चौक, गणेशनगर व वीज सबस्टेशन या ठिकाणी रविवारी बावीस सी.सी.टी.व्ही कॅमेरे कार्यान्वित होतील. रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत या तिसरा डोळा उपक्रमाचे लोकार्पण होईल. त्यामुळे संगमनेर शहरातील गुन्हेगारी रोखण्यास हातभार लागेल.

Web Title: ahmednagar news sangamner city and cctv camera