Crime News: गाडीची चावी दिली नाही; सख्ख्या भावाचा खून

रत्नाकर नळेगावकर
Thursday, 7 January 2021

अहमदपूर तालुक्यातील माळेगाव येथे सख्या भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडली आहे.

अहमदपूर ( जि.लातूर): आजकाल बऱ्याच जणांचे रागावरचे नियंत्रण सुटल्याने मोठे प्रसंग निर्माण होत असल्याचे दिसले आहे. असाच एक प्रकार लातूर जिल्ह्यातील माळेगावमध्ये घडला आहे. माळेगाव येथील अल्लारखा फकीर हे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे राहत होते. त्यांचा भाऊ अमर फकीर, आपल्या आई व पत्नी सोबत शेजारीच राहतात.

मंगळवार (ता.5) दुपारी अमर फकीर याने भाऊ अल्लारखा यास मोटारसायकलची चावी मागितली असता त्यास नकार मिळाल्याने त्याने रागाच्या भरात अंगणात ठेवलेल्या सरपणाचे लाकूड घेऊन अल्लारखा याच्या डोक्यात घातल्याने  जाग्यावर कोसळून तो मयत झाला.

कार अपघातात एक ठार; जळकोट तालुक्यातील घटना

मयताची पत्नी मनगवर अल्लारखा यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी (ता.6) अहमदपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपीस अटक झाली असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले व पोलीस निरिक्षक सुनिल बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.बी. सरोदे हे करीत आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmedpur crime news Brother killed for refusing to give bike keys