अहमदपूरात चोरट्यांचा धूमाकूळ; दीड तासात तीन घरातील लाखोंचा माल लंपास 

प्रा. रत्नाकर नळेगांवकर
Thursday, 6 August 2020

शहरात चोरांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली असून गुरूवारी (ता.६) भरदिवसा विविध तीन ठिकाणी घरफोडी करून लाखोचा माल लंपास केला आहे. अवघ्या एक ते दीड तासात हा चोरीचा प्रकार घडल्याचे समोर आले.  

अहमदपूर (जिल्हा) : शहरात चोरांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली असून गुरूवारी (ता.६) भरदिवसा विविध तीन ठिकाणी घरफोडी करून लाखोचा माल लंपास केला आहे. अवघ्या एक ते दीड तासात हा चोरीचा प्रकार घडल्याचे समोर आले.  

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

अहमदपूर शहरात सकाळी अकरा ते साडे बाराच्या दरम्यान गावातील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, व्यंकटेश नगर, गायकवाड कॉलनी या तीन ठिकाणी चोरी झाली. तिन्ही ठिकाणी घराची कडी-कोयंडा तोडून चोरी करण्यात आली आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  
शासकिय विश्रामगृहाच्या पाठीमागे राहत असलेल्या अमोल सज्जखेडे हे बस्वेश्वर चौकात असलेल्या दुकानांत गेले. तर त्यांची आई खरेदीला बाहेर जायचे म्हणूनघराला कुलूप लावून बाहेर पडल्या. सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दोन तोळे सोने व एक लाख नव्वद हजार रोख असा एकूण तीन लाख रूपयांचा ऐवज लांबविला आहे.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश
शहरातील व्यंकटेश नगर येथील शिवाजी नलवाड यांची पत्नी व मुलगा सकाळी दहा वाजता घराला कुलूप लावून माकणी येथे पाहुण्याकडे गेले होते. तर शिवाजी नलवाड हे घराच्या बाजूला असलेल्या स्वतःच्या दुकानात गेले. बारा वाजता घरी परतले असता घराची कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे लक्षात आले. कपाटातील रोख पन्नास हजार लांबवले.   
गायकवाड कॉलनीतील अविनाश जाधव यांच्या घराचे कुलूप कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील एक तोळे सोने, दोनच्या ग्रॅम अंगठी, चांदीचे वाळे असा एकूण एक लाख रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. यासंबंधी घटनास्थळी दाखल झाले आहे. बोटांचे ठसे तपासणी पथक व श्वान पथकास पाचारण केले असून गुन्हा नोंद प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत चालू होती. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश

नागरीकांनी स्वतः दक्ष रहावे. कमीत कमी एखादा सदस्य घरात रहावा. एखाद्या प्रसंगी घराला कुलूप लावूनच जावं लागलं तर शेजा-यांना सागून जावं. शेजारी हेच पहारेकरी म्हणून एकमेकांना सहकार्य करावे.
सुनीलकुमार पुजारी, पोलिस निरीक्षक.  

     

(संपादन-प्रताप अवचार)

   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmedpur three houses Theft