अजिंठा बॅंकेच्या शाखाधिकाऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

औरंगाबाद - औरंगाबादेतील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे शाखा अधिकारी धर्मेंद्र दिगंबर पुराणिक (वय 45) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.

पुराणिक हे उस्मानपुरा येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे शाखा अधिकारी होते. राहत्या घरात त्यांनी गळफास घेतल्याची बाब सकाळी उघड झाली. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

Web Title: ajintha bank manager suicide