
बीड : जिल्ह्यातील विविध आर्थिक संस्थांमध्ये जिल्ह्यातील लाखो ठेवीदारांचे अडकलेले पैसे मिळण्याच्या अनुषंगाने सर्व फरार संचालकांना अटक करावी, त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात, जप्त मालमत्तांचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे द्यायला सुरवात करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. याबाबत आपण स्वत: केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहांकडे पत्रव्यवहार करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.