Ajit Pawar Video : ...अन् भर सभेत अजित पवारांनी सुरूवात केली गाण्याला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit pawar

Ajit Pawar Video : ...अन् भर सभेत अजित पवारांनी सुरूवात केली गाण्याला

Ajit Pawar Sing Song In Osmanabad : अजित पवारांच्या कामाची आणि शिस्तीची ज्याप्रमाणे चर्चा होते. त्याचप्रमाणे त्यांच्या हजरजबाब पणाचीही होते. यापूर्वी अनेकदा अजित पवारांना आपण कार्यकर्तांना मार्गदर्शन, काम न झाल्यास रागावताना पाहिले आहे. मात्र, कधी गाणं गुणगुणतांना ऐकलेले नाही. मात्र, आता अजित पवारांना गाणं गुणगुणतांना पाहण्याचीदेखील या एका घटनेनं पूर्ण झाली आहे. उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमात चक्क अजित पवारांनी गाण्याच्या दोन ओळी गुणगुणल्या अन् कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करत याला जोरदार दादही दिली.

त्याचं घडलं असं, अजितदादांची उस्मानाबादेत सभा सुरू होती. त्यावेळी मध्येच एका व्यक्तीने त्यांना चिठ्ठी पाठवली. त्यावेळी अजित पवारांनी त्यांचं भाषण थांबवत ए द्या रे त्याची चिठ्ठी. द्या असं म्हटले. हे वाक्य म्हटल्यानंतर लगेचच अजित पवारांनी चिठ्ठी आयी है हे बोल गुणगुणले त्यांचा हा अंदाज बघून उपस्थित टाळ्यांचा गजर करणार नाही ते कार्यकर्ते कसले. अजितदादांचे हे शब्द ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा गरज करत अजितदादांच्या या कलेला दाद दिली.

हेही वाचा: Eknath Shinde : शिंदेंच्या तोंडी फडणवीसांची लाईन; वाचा काय म्हणाले

स्टेजवर चिठ्ठी हाती घेतल्यानंतर अजित पवारांनी मी लक्ष घालतो असे म्हणत मी साखर आयुक्तांशीही बोलतो. हे चुकीचं आहे. राणांचा असो वा कुणाचाही असो साखर कारखाना भाव दिलाच गेला पाहिजे असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिले.