Eknath Shinde : शिंदेंच्या तोंडी फडणवीसांची लाईन; वाचा काय म्हणाले

शिंदेंच्या या विधानानंतर मुख्यमंत्री फडणवीसांना तर फॉलो करत नाही ना? या चर्चांना उधाण आले आहे.
Eknath Shinde Fadanvis
Eknath Shinde Fadanvis Sakal

Eknath Shinde News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने म्हणायचे की, आमचं सर्व कामं पारदर्शक आहेत. त्यांचे हेच वाक्य हेरत आज राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्गागरले आहे. त्यांच्या या विधानानंतर शिंदे फडणवीसांना तर फॉलो करत नाही ना? या चर्चांना उधाण आले आहे. पनवेल येथील एका शाळेत 5G संबंधित एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Eknath Shinde Fadanvis
Video : PM मोदींचा स्वॅगच निराळा; प्रगती मैदानात बसून युरोपमध्ये चालवली कार

त्याचे झाले असे की, पनवेल येथील शाळेतील कार्यक्रमानंतर शिंदेंना मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार का? असा प्रश्न शिंदेंना विचारला. त्यावर त्यांनी मी एकदम पारदर्शक असून, काही लपून ठेवत नाही. माझं जे काही आहे ते सर्व उघडं आहे, असे विधान केले आहे.

Eknath Shinde Fadanvis
2G to 5G Journey : 27 वर्षांपूर्वीचे 2G ते 5G, असा वाढला भारताचा स्पीड

शिंदे म्हणाले की, नार्वेकर शिंदे गटात येणार की नाही याबाबत काही माहिती नाही असे, सांगत आज माझा मूड चांगला आहे. त्यामुळे आज राजकारणावर काही बोलायला नको असे शिंदे म्हणाले. शिंदेंच्या या विधानामुळे नार्वेकर शिंदे गटात खरंच येणार का? या प्रश्नावर मात्र, सस्पेंन्स कायम राहिला आहे.

Eknath Shinde Fadanvis
Chhagan Bhujbal : मला बदनाम करण्याचा प्रयत्न, टेकचंदानींना कोणतीही धमकी दिली नाही; भुजबळांनी आरोप फेटाळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतून 5G इंटरनेट सेवा लाँच केली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 5जी च्या लाँचिंगमुळे एक नवीन क्रांति घडणार आहे. सुरुवातीला ही सेवा भारतातील मोजक्याच शहारात सुरू केली जाणार आहे. यात राज्यातील मुंबई, पुणे आणि पनवेल या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com