शिक्षणसंस्था मोडीत काढण्याचा सरकारचा डाव- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

बीड : कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या शिक्षण संस्था असल्याने द्वेषाभावाने पेटून या संस्था मोडीत काढण्याचा डाव भाजप सरकार आखत आहे, असा आरोप करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची शिक्षकांबाबत नकारात्मक भूमिका असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व विविध शिक्षक संघटनांचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते.
पवार म्हणाले, भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांवर या सरकारने लाठीहल्ला केला आहे. शिक्षण विभागात रोज नवीन निर्णय घेऊन प्रश्‍न जटिल बनविण्याचे काम केले जात आहे.

आरक्षण रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते करतात. मग गरिबांची मुले शिकणार कशी, असा सवाल त्यांनी केला. या वेळी आमदार जयदत्त क्षीरसागर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित आदी उपस्थित होते.

Web Title: ajit pawar slams bjp govt over education policy