(व्हिडिओ पाहा) भाषण संपविण्याची चिठ्ठी येताच, तुमच्या संमेलनाची शोभा वाढवायला आलो नाही म्हणत साहित्यिक डाॅ. अक्षयकुमार काळे संतापले

महेश गायकवाड
Saturday, 1 February 2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अठराव्या राज्यस्‍तरीय प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन डाॅ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते शनिवरी (ता.1) झाले. यावेळी उद्घाटनपर भाषण सुरु असताना डाॅ. काळे यांना भाषण आवरते घेण्याची चिठ्ठी आल्याचे पाहून डाॅ. काळे संतापले.

जालना : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अठराव्या राज्यस्‍तरीय प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाची सुरूवात शनिवारी (ता.एक) साहित्यीक व रसिक प्रेक्षकांचा अपमान करणारी ठरली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांच्या हस्‍ते महाराजा अग्रसेन भवनात या संमेलनाचे उद्‌घाटन झाले. उद्‌घाटनपर भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रंगात आलेले डॉ. काळे यांचे भाषण अचानक थांबवण्याची चिठ्ठी आल्याने रसिकांसह डॉ.काळे यांचा हिरमोड झाला. विद्यार्थ्यांनी भाषण सुरू ठेवण्याची मागणी केली. मात्र,  या कृतीवर डॉ.काळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत हे अपमानकारक असल्याचे म्हणत आपले भाषण थांबवले.

अतिशय उत्साही वातावरणात महाराजा अग्रसेन भवनात प्रारंभ झालेल्या प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाचा रंग आयोजन समितीच्या एका कृतीमुळे बेरंग झाला. मांन्यवरांच्या हस्‍ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजनाने संमेलनाी सुरूव्‍ाात झाली. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सारंग जोशी,  संमेलनाचे निमंत्रक डॉ.सुनिल कुलकर्णी, प्रेदश मंत्री स्‍वप्नील बेगडे, प्रा.सुरेश मुंडे, नगराध्यक्षा संगिता गाेरंट्याल, रसायन तंत्रज्ञान संस्‍थेच्या संचालिका डॉ.स्‍मीता लेले यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा-  वारे...पठ्ठ्या...! केवढे हे कौतूक...  पोलिस अधीक्षकांनी कडेवर घेत केला सत्कार

प्रा.डॉ.अक्षयकुमार काळे यांचे भाषण ऐन रंगात येत आले असताना आपल्या मनोगताची वेळ संपली आहे. असे लिहलेली एक चिठ्ठी त्यांना आली. यावर उपस्थितीत विद्यार्थ्यांनी भाषण सुरू ठेवण्याची मागणी केली. मात्र, मी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आलो असताना अशी चिठ्ठी का येते? असा प्रश्‍न उपस्थित करत संमेलनातील मुख्य व्यक्त्यांना बोलु द्या.  तो विद्यार्थ्यांशी ह्रदय संवाद साधायला आलेला असतो, तुमच्य  कार्यक्रमाचा डेकोरम पूर्ण करण्यासाठी नाही. ही प्रकार अपमानकारक असल्याचे म्हणत त्यांनी आपले भाषण थांबवले. व आपले जागा घेतली. या प्रकारामुळे उपस्थित साहित्यीक व विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले.

हे वाचलंत का?- राज्य महामार्गावर दरोडेखोर-पोलिसांत चकमक, हवेत गोळीबार: पोलिस निरीक्षक जखमी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bhartiy vidyarthi parishad Sahity Samelan Dr. Akshaykumar Kale jalna news