'मिस इंडिया' स्पर्धेत अकोल्याची इशिता कोठारी उपविजेती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

अकोला - आग्रा येथे स्टारलाईफ इंटरटेन्मेंट या संस्थेच्या वतीने प्रतिष्ठेच्या मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अकोल्यातील राधादेवी गोयेंका महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी इशिता प्रमोद कोठारीने उपविजेतेपद मिळविले. 

अकोला - आग्रा येथे स्टारलाईफ इंटरटेन्मेंट या संस्थेच्या वतीने प्रतिष्ठेच्या मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अकोल्यातील राधादेवी गोयेंका महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी इशिता प्रमोद कोठारीने उपविजेतेपद मिळविले. 

आग्रा येथे नुकतीच ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी देशातील चाळीस महानगरातील हजारो युवतींचे ऑडिशन व मुलाखती घेण्यात आल्या. त्यात इशिताने दुसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. ती तोष्णिवाल लेआऊट परिसरातील रहिवाशी आहे. रादेगो महिला महाविद्यालयातील एम.कॉम.ची विद्यार्थिनी असलेल्या इशिताला लहानपणापासूनच या क्षेत्राची आवड आहे. या स्पर्धेसाठी तिने नागपूर येथे ऑडिशन दिली होते. कठोर परिश्रम आणि कोरिओग्राफरच्या नियंत्रणात तिने या स्पर्धेची तांत्रिक माहिती व प्रशिक्षण आत्मसात केले. 

मिस इंडिया व मिस्टर इंडिया या दोन्ही श्रेणीत असणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम चाचणीत देशभरातील ९६ स्पर्धकांची निवड झाली होती. त्यातील अंतिम फेरीपर्यंत केवळ पंधरा स्पर्धक पोहोचले. अत्यंत्य चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अखेर कु. इशिता ही द्वितीय (रनरअप) ठरली. आधुनिक मॉडेलिंग आणि फॅशन विश्वात करियर करायचे असल्याची प्रतिक्रिया तिने यावेळी व्यक्त केली.

इशिताने या स्पर्धेसोबतच स्टारलाईफ इंटरटेन्मेंटचा ‘मिस नागपूर’ म्हणूनही पुरस्कार प्राप्त केला. आई कुमुद कोठारी, भाऊ हर्षित यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाली असून, आई-वडिलांच्या भक्कम पाठबळामुळेच आपणास यशाचे शिखर गाठता आल्याचे मत इशिताने यावेळी व्यक्त केले. 

Web Title: Akola's Ishita Kothari,runner-up in Miss India tournament