मोबाईलवर बोलत रस्त्याने जाताय, तर सावधान! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

औरंगाबाद : मोबाईलवर बोलत-बोलत रस्त्याने तुम्ही जात असाल, तर सावधान. मोबाईल चोरांची तुमच्यावर नजर असू शकते. फोनवर बोलण्यात गुंग असलेल्या तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या चोरांनी हिसकावून पळ काढला. मिनिटभरातच ही घटना नऊ जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास घडली. 

अक्षय नवनाथ गायकवाड हा तरुण सौंदाना, ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथील आहे. शहरातील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात तो एम. फार्मसीचे शिक्षण घेतो. नऊ जानेवारीला सायंकाळी सातला तो फोनवर बोलत-बोलत गेटजवळ आला. त्याचे बोलण्यातच पूर्ण लक्ष होते. हीच संधी साधून तिघे दुचाकीवरून त्याच्या मागून आले. त्यातील एकाने त्याचा मोबाईल हिसकावला व क्षणात दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेनंतर अक्षयने थोडासा पाठलागही केला; पण उपयोग झाला नाही. त्याने याबाबत वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, गुन्हाही नोंदविण्यात आला. लक्ष विचलित असणे, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, बाजूला बोलण्यातच गुंग असणे या बाबी मोबाईलधारकांच्या अंगलट येऊ शकतात.

Web Title: alert when you are on road and talking on mobile