पाटोद्यात सर्व धर्मीय मूक मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पाटोदा - कठुआ आणि उन्नावसारख्या अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी या मागणी साठी मंगळवारी (ता.१७) पाटोदा शहरात सर्व धर्मीय मूक मोर्चा निघाला.   

शहरातील शिवाजी चौकामधून सुरू झालेला हा मोर्चा राज मोहम्मद चौक, बाजार तळ असा मार्गक्रमण करत भगवान चौक मार्गे तहसीलवर धडकला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये यासर्व  अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या आरोपींचे समर्थन करणाऱ्यांवर देखील बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. पीडितांना व त्यांच्या कुटुंबांना संरक्षण देण्यात यावे. हे सर्व प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येऊन दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. अशा प्रमुख मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या.  हाताला काळी फीत बांधून व निषेधाच्या पाट्या हातात घेऊन सर्वच स्तरातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: All religious muka morcha in Patoda