esakal | गांजा पेरण्याची परवानगी द्या, कर्जासाठी बँकाचे दरवाजे बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटना

बोलून बातमी शोधा

स्वाभीमानी शेतकरी संघटना
गांजा पेरण्याची परवानगी द्या, कर्जासाठी बँकाचे दरवाजे बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटना
sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यात अवकाळी पावसामुळे मागच्या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाहीत. आणि खरीप हंमाम जवळ आला असताना शासनाने बँका बंद (Bank close)केल्याल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात गांजा पेरण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन (Swabhimani shetkari sanghatna)तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्याकडे (chief minister)मंगळवारी (ता. चार) निवेदनाद्वारे केली आहे.

सेनगाव तालुक्यात गेल्या वर्ष भरापासून अवकाळी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मागच्या वर्षातील पिक कर्ज अजुन मिळाले नाही. आणि आता यावर्षी खरीप हंगाम जवळ आला आहे. परंतु जिल्हाधिकारी यांनी ऐन वेळेवर बँका बंद केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील बँकाकडून शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करुन पूर्ण झाले असताना हिंगोली जिल्हा काय पाकिस्तानमध्ये आहे का? असा प्रश्न स्वाभिमानीने प्रशासनाला विचारला आहे. अजून पिक कर्ज वाटप चालू होत नाही. जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला की, व्यापाऱ्यांचा व्यवहार सुरु मात्र शेतकऱ्यांचा व्यवहार बंद. पण साहेब लॉकडाऊनमुळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले असताना प्रशासनाचा मदतीचा हात पुढे येत नाही. पण आता आदेशाची भिती वाटायला लागली. कारण कोरोनाने माणूस संपतो.

हेही वाचा - "कोरोनाला रोखण्यासाठी फक्त लॉकडाउनच पर्याय"

तुमच्या आदेशाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सोबतच कृषी विभाग सुध्दा आता नावालाच उरलाय. घरात खत नाही. बी नाही. बँकाचं कर्ज नाही. दरवर्षी मोठ्या मेहनतीने पेरणी करुन हाती काहीच नाही. एवढे करुन आता काय गांजा पेरणी करावे का ? त्यामुळे आपण गांजा पेरण्याची परवानगी तरी द्यावी अशा मागणीचे निवेदन मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्याला पाठवण्यात आले आहे. यावेळी नामदेव पतंगे, ज्ञानेश्वर, उत्तम आठवले, कडूजी बोरकर आणि गणेश मारोती काळबांडे यांची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे