esakal | "कोरोनाला रोखण्यासाठी फक्त लॉकडाउनच पर्याय"

बोलून बातमी शोधा

Lockdown
"कोरोनाला रोखण्यासाठी फक्त लॉकडाउनच पर्याय"
sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोना महामारीच्या (COVID-19) दुसऱ्या लाटेनं भारतामध्ये हाहाकार माजवला आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या नवीन विक्रम प्रस्थापीत करत आहे. आरोग्य सुविधांच्या उडालेल्या बोजवाऱ्यामुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव (COVID-19) रोखण्यासाठी काही राज्यांनी कडक लॉकडाउन (Lock down in india) घेतला आहे. मोदी यांनी लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असल्याचं म्हटलं आहे. टास्क फोर्सनं अनेकदा लॉकडाउन लावण्यात यावा, अशी सुचनाही दिली आहे. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी ट्विट करत आपल मत मांडलं आहे. (Only way to stop COVID-19 spread now is full lockdown: Rahul Gandhi)

राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्रातील मोदी सरकारला लॉकडाउन घेण्याचा सल्ला दिलाय. राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटलेय की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचा एकमेव उपाय संपूर्ण लॉकडाउन (Lock down in india) आहे. केंद्र सरकारला ही बाब समजत नाही. देशात लॉकडाउन न लावून केंद्र सरकर सर्वसामान्य नागरिकांचा जीव घेत आहे.

राहुल गांधी यांचं ट्विट -

हेही वाचा: देशात लॉकडाउन हवाच, टास्क फोर्सची मागणी; केंद्र सरकार निर्णय घेणार?

राहुल गांधी यांनी गतवर्षी लॉकडाउनला (Lock down in india) विरोध दर्शवला होता. एप्रिल 2020 मध्ये मोदी सरकारनं पहिल्यांदा लॉकडाउन लावला तेव्हा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका केली होती. लॉकडान कोरोनाचा (COVID-19) फक्त वेग मंदवतो त्याला संपवत नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. यावेळी राहुल गांधी यांनी संपूर्ण लॉकडाउनला पाठींबा दर्शवला आहे.