वडिलांना किराणा सामान घेऊन जाणाऱ्या मुलाला भरधाव बसची धडक; बसचालक पसार

बाबासाहेब गोंटे
Wednesday, 20 January 2021

जालना-अंबड महामार्गावरील मठपिंपळगाव फाट्यावर बसच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे

अंबड (जालना): सालदार वडिलांसाठी किराणा सामान घेऊन मोटरसायकलवर जात असताना अंबडकडून जालन्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात झालेल्या तरुणाचे नाव संदिप (संजय) अरुण शिंदे (वय 17वर्षे) इंदेवाडी (ता.जालना ) असे आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, काही सामान घेऊन अंबडच्या दिशेने शेताकडे सदर युवक निघाला असता त्यास अंबडकडून जालन्याच्या दिशेने जाणार्‍या बीड अकोला या बसने(एम. एच 40 ए.क्यु - 6134) ने जोराची धडक दिल्याने मोटर सायकल (एम 21 ए - 7358) वरील संजय शिंदे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर इजा झाल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला. बस चालक तेथून फरार झाला.

सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकर - कारचा भीषण अपघात

गंभीर जखमी युवकास तात्काळ मठपिंपळगाव येथील  जगदीश जिगे ,संदिप डावखर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गाडीत टाकून प्रथम जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तब्येत सिरीयस असल्याने नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातनंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांना या बाबत कळविण्यात आले होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amabd accident news boy hit by speeding bus driver ran away