अमरसिंह पंडित यांची शरद पवारांच्या वाढदिवसनिमित्त मोठी घोषणा

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 13 December 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार यांचा वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी एक घोषणा केली आहे

गेवराई (जि. बीड) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार यांचा वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी एक घोषणा केली आहे. खासदार शरद पवार यांचा वाढदिवस शनिवारी बीड जिल्ह्यात विविध सामाजिक, आरोग्य उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

या घोषणेत भारतीय सैन्यदलात भरती होणाऱ्या गेवराई मतदार संघातील प्रत्येक युवकांच्या परिवारातील विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे पंडित यांनी सांगितले. यामुळे सामान्य कुटुंबातील तरुणांना देश रक्षणासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा या निमित्ताने मिळणार असल्याचे प्रतिपादनही यावेळेस पंडित यांनी केले.

परिस्थितीवर मात करत अखेर चारही बहिणी होणार डॉक्टर

याप्रसंगी गेवराई विधानसभा मतदार संघातील किसन दराडे, आकाश सागडे, मारोती बोरकर, महादेव राठोड, भगवान ढाकणे, योगेश मुंडे, राजकुमार नाकाडे, करण मोंढे, उमेश गोरे, संतोष गरड, विशाल डोंगरे, महेश काळे, ऋषिकेश इथापे, शहाजी थिटे, पवन महारगुडे, गणेश जोगदंड हे तरुण नुकतेच भारतीय सैन्यदलात भरती झालेले तरुण उपस्थित होते. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी अमरसिंह पंडित यांच्या हस्ते या युवकांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

शरद पवार यांचा वाढदिवस सर्वांनाच उर्जा देणारा असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशप्रेमाची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पंडित म्हणाले. मतदार संघातून अधिकाधिक युवक सैन्यदलात भरती व्हावेत, अशी भावनाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

पोलिस असल्याचे सांगत शेतकऱ्याची भरदिवसा फसवणूक

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, बाबुराव जाधव, बाळासाहेब मस्के, जगन पाटील काळे, जगन्नाथ शिंदे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amar Singh Pandit big announcement on Sharad Pawar birthday