
अंबड तालुक्यातील नागोण्याची वाडी येथील दूध उत्पादक व विक्री करणाऱ्या शेतकर्यांची भरदिवसा पोलिस असल्याची बतावणी करत फसवणूक केली आहे.
अंबड (जि. जालना) : अंबड तालुक्यातील नागोण्याची वाडी येथील दूध उत्पादक व विक्री करणाऱ्या शेतकर्यांची भरदिवसा पोलिस असल्याची बतावणी करत फसवणूक केली आहे. हे प्रकरण अंबड तालुक्यात घडले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील नागोण्याचीवाडी येथील दूध उत्पादक व विक्री करणारे शेतकरी दगडू सखाराम वंजारे हे शनिवारी (ता.12) दुपारी बारा ते साडे बारा वाजेच्या दरम्यान पाचोड येथे दूध विक्री करून आपल्या नागोण्याचीवाडी गावाकडे लुनावरून चालले होते. पाचोडकडून पाठीमागून दुचाकीवरून येऊन दगडू वंजारे यांना रस्त्यात रोखले आपण पोलिस असल्याची बतावणी केली.
परिस्थितीवर मात करत अखेर चारही बहिणी होणार डॉक्टर
दुधाच्या रिकाम्या कॅन मध्ये डोकावून पाहत आपण यातून गांजा विक्री करता असे म्हणत अगोदर वंजारे यांना भयभीत केले. नंतर आपण बोटात सोन्याच्या अंगठ्या का ठेवता वातावरण फार खराब आहे. असे म्हणत सोन्याच्या तीस हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या हातरुमाल बांधून पाठीमागून आलेल्या दुसऱ्या इसमा बरोबर दुचाकीवरून पलायन केले.
अंबड पोलिस ठाण्यात दगडू वंजारे यांनी अज्ञात चोरट्याने पोलिस असल्याची बतावणी करून सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे करत आहे. अशी माहिती ठाणे अंमलदार हर्षवर्धन मोरे यांनी दिली आहे.
(edited by- pramod sarawale)