

Gondi Police cracked the Swift Dzire car robbery case within six hours and arrested two accused from Chhatrapati Sambhajinagar.
Sakal
अशोक चांगले
सुखापुरी : अंबड तालुक्यातील गेवराईनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक कार चोरीच्या घटनेचा उलगडा अवघ्या सहा तासांत करण्यात गोंदि पोलिसांना यश आले आहे. हॉटेल संगम येथून गाडीमालकास मारहाण करून स्विफ्ट डिझायर कार व इतर साहित्य चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे.