

Ambad Taluka Murder Case Younger Brother Held After Elder Brother Found Dead Following an Axe Attack at Home in Maharashtra
esakal
अंकुशनगर: अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे लहान भावाने मोठ्या भावाचा झोपेतच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी (दि. २६) मध्यरात्री घडली. मंगळवारी (दि. २७) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तुकाराम जगन्नाथ काकडे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी त्याचा लहान भाऊ रामेश्वर जगन्नाथ काकडे (वय २२) याला गोंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.