

Ambad municipal election sees long queues after voting machine failure
Sakal
अंबड : जालना जिल्हयातील अंबड येथे नगर पालिका निवडणुकीत मंगळवारी (ता.2) सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. शहरातील पंचायत समिती येथील मतदान केंद्र क्रमांक 11 मधील मशीन बंद पडल्याने साडे सात वाजल्यापासून मशीनमध्ये बिघाड झाल्याने जवळपास साडे नऊ वाजता मशिनमध्ये दुरूस्ती करण्यात आली. जवळपास दीड ते पावने दोन तास मशिन बंद राहिल्याने दीव्यांग व वृध्द यांना सकाळी साडे सात ते मतदान होईपर्यंत ताटकळत बसावे लागले. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.