
Ambad Nagar Parishad Election
Sakal
बाबासाहेब गोंटे
अंबड : जालना जिल्हयातील अंबड नगर पालिकेचे आरक्षण घोषीत झाल्याने निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेकांनी आतापासूनच कंबर कसली आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच जोमात सुरू होणार असल्याचे चित्र पाहण्यासाठी मिळत आहे. नगराध्यक्षपदासाठी सर्वच पक्षाने चाचपणी सूरू केली आहे.याचबरोबर नगर सेवक पदासाठी प्रत्येक प्रभागातून कोणाला उमेदवारी द्यायची आहे. याबाबत सर्वच पक्षातील नेते यासाठी बैठक घेत आहे. दिवाळीपूर्वीच अनेकांनी फटाक्याची आतषबाजी करत आपणच उमेदवार असल्याचा अप्रत्यक्ष प्रचार सुरू केला आहे.