Ambad News : डावरगावचा लघू तलाव शंभर टक्के भरला: पिण्याच्या पाण्यासह फळबागा वाचविण्यासाठी जलसाठा ठरणार उपयुक्त
Ambad Water Supply : अंबडजवळील डावरगाव येथील ६५ वर्षांपूर्वीचा लघू तलाव शंभर टक्के भरल्याने गावातील पिण्याचे पाणी, शेती व पशुपालकांचा प्रश्न सुटला आहे.
अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरालगत असलेल्या डावरगाव येथील लघू तलाव शंभर टक्के भरला आहे.यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्यासह पशुपालक व शेतकऱ्याना फळबागा जगविण्यासाठी या लघू तलावातील जलसाठा उपयुक्त ठरणार आहे.