अंबाजोगाईत उन्हाचा पारा ४२ वर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

अंबाजोगाई - उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी (ता. २४) दुपारी उष्णता वाढल्याने पारा ४२ अंशावर गेला. रस्ते निर्मनुष्य होत असून, दुपारी गावातील वर्दळ थांबत आहे. उष्णतेने तहानलेल्या नागरिकांसाठी काही ठिकाणी पाणपोया उभारण्यात आल्या आहेत.

भरदुपारच्या विवाह मुहूर्तामुळे पाहुणे मंडळी व मित्रपरिवारांची गैरसोय वाढली आहे. उन्हामुळे बांधकामावरील मजूर थकत असल्याने कामे मंदावत आहेत. प्रवाशांच्या वहातुकीवरही उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवतो. तहानलेले नागरिक उसाच्या रसवंतीवर आणि आईस्क्रीम पार्लवर गर्दी करताना दिसतात. काही नागरिक टोप्या व पांढरे रूमाल बांधून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. शेतकरी व शेतमजूर झाडाखाली सावलीला आश्रय घेतात. येथील पालिकेच्या पोहण्याच्या तलावावर मुले गर्दी करीत आहेत. येथील बाजार समितीच्या परिसरातील मंगळवार आठवडे बाजार जोरात भरलेला दिसत होता. भाजीपाला विक्रेते भरउन्हात भाजी विक्री करीत होते. मिरची, किराणा, कपडे विक्रेत्यांनीही छोटी दुकाने उभारली होती. ग्राहकांची वर्दळ मात्र उन्हामुळे कमी झाली होती.

Web Title: Ambajogai at 42 temperature