मराठवाडा साहित्य संमेलनासाठी जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

अंबाजोगाई - येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या आद्दकवी मुकुंदराज साहित्य नगरीत ता. २४ आणि २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी नियोजनबद्ध तयारी सुरू असून, या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

यासाठी मुख्य सभागृहासह इतर दोन सभागृहांची निर्मिती करण्यात आली असून या तीनही सभागृहांना ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन नावे देण्यात आली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, स्वागत समितीचे उपाध्यक्ष अमर हबीब व कार्यवाह दगडू लोमटे यांनी दिली.

येथील योगश्वरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात येत्या २४ आणि २५ डिसेंबर रोजी बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने आखणी करण्यात येत असून, या संमेलनात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी स्वामी रामानंद तीर्थ सभागृह, सर्वज्ञ दासोपंत सभागृह, भगवानराव लोमटे सभागृह व राम मुकद्दम खुले व्यासपीठ यांची निर्मिती करण्यात आली आहे.
जागर दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन आणि इतर सर्वच कार्यक्रमांत वेगळेपण जपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न संयोजकांकडून करण्यात येत असून, हे संमेलन यापुढे आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनांना एक नवा आदर्श आणि नवा पायंडा पाडणारे ठरेल, असा विश्वास संयोजन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: ambajogai marathwada news marathwada sahitya sammelan