ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला अमेरिकन राजदूताची भेट

किशोर पाटील
शुक्रवार, 15 मार्च 2019

दौलताबाद : दौलताबाद (ता. औरंगाबाद) येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला अमेरिकेचे राजदूत केनेथ जेस्टर यांनी शुक्रवारी(ता. 15) सकाळी अकराच्या सुमारास भेट देऊन  किल्ल्याची माहिती जाणून घेत पर्यटनाचा आनंद घेतला.

केनेथ यांचा हा खासगी दौरा असून ऐतिहासिक वारसा स्थळांबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षण व आवड असल्याने ते ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असतात. त्या अनुसारच औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. दौलताबाद, वेरूळ, अजिंठा, मकबरा आदी ठिकाणी ते यावेळी भेट देणार असल्याचे त्यांच्या वृत्त विभागातील सहकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांना प्राध्यापक अंकिता राणे यांनी किल्ल्याची माहिती दिली. हत्ती हौद, भारतमाता मंदिर, चांदमीनार, काळा कोट, मेंढा तोफ, भुलभुलैय्या  आदी ठिकाणी त्यांनी आपल्या मित्र व  सहकार्यांसह छायाचित्रण करत सेल्फीचा आनंद घेतला. 

यावेळी  सी. जी.इडीथ, सांस्कृतिक विदेश कार्यमंत्री तथा समन्वयक फिनेल जेम्स, सहायक पुरातत्वविद्य श्री रजनीश, संरक्षण सहाय्यक संजय रोहनकर, दौलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफा, विशेष सुरक्षा शाखेचे निरीक्षक यांची उपस्थिती होती.

Web Title: ambassador of america visits devagiri fort at aurangabad