घाटनांदुरात गुटखा माफियांवर पोलीस उपअधीक्षक पथकाच्या धाडी | Beed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beed

घाटनांदुरात गुटखा माफियांवर पोलीस उपअधीक्षक पथकाच्या धाडी

घाटनांदूर : येथील किराणा दुकानदारांना गुटखा विक्री करताना (ता.७) शुक्रवारी दुपारी चार वाजता अंबाजोगाईचे पोलीस अधीक्षक सुनील जायभाय(s.p. sunil jaibhai) यांच्या पथकाने तीन किराणा दुकानावर धाड टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त(crime) केला. राज्यात गुटखा विक्रीस बंदी असतानाही येथील किराणा दुकानदार परराज्यातून गुटखा आणून स्थानिक पोलिसांशी अर्थपूर्ण सबंध ठेवून गुटख्याचा साठा करून पाणीपट्टीधारकांसह आजूबाजूच्या खेड्यातील किरकोळ विक्रेताना राजरोसपणे गुटखा विक्री करत होते. यातून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत होती.खेड्या-पाड्यात किराणा दुकान, पाणपट्टीवर सहज गुटखा उपलब्ध होत असल्याने शालेय विद्यार्थ्यापासून युवकांना मोठ्या प्रमाणात गुटख्याचे व्यसन जडले आहे.

हेही वाचा: औरंगाबाद ब्रदरची रुग्णालयातच 'गळफास' घेऊन आत्महत्या

पोलिसांनी टाकलेल्या धाडीत भरवस्तीत असलेल्या एका किराणा दुकानदाराच्या जुन्या घरातून साठा करून ठेवला टेम्पो भरून आर एम डी, गोवा, इतर नावाचा गुटखा जप्त केला आहे. तर दोन किराणा व्यापाऱ्यांच्या दुकानातून गुटखा जप्त केला असून व्यापाऱ्यांना मुद्देमालास ताब्यात घेतले आहे. असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवीची रात्री उशिरपर्यत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BeedcrimeMarathwada
loading image
go to top