पूरग्रस्तांसाठी सरसावली महापालिका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पूर ओसरण्यास सुरवात झाली असली, तरी हजारो कुटुंबे बेघर झाली असून, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे राज्यभरातून पूरग्रस्त भागासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. औरंगाबाद महापालिकेचे अधिकारी-नगरसेवकदेखील मदतीसाठी सरसावले आहेत. अधिकारी संघटनेकडून 11 लाख, तर नगरसेवकांचे पाच लाख रुपये मानधन अशी 16 लाख रुपयांची मदत 19 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे. 

औरंगाबाद - कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पूर ओसरण्यास सुरवात झाली असली, तरी हजारो कुटुंबे बेघर झाली असून, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे राज्यभरातून पूरग्रस्त भागासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. औरंगाबाद महापालिकेचे अधिकारी-नगरसेवकदेखील मदतीसाठी सरसावले आहेत. अधिकारी संघटनेकडून 11 लाख, तर नगरसेवकांचे पाच लाख रुपये मानधन अशी 16 लाख रुपयांची मदत 19 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे. 

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत सध्या पूर ओसरत असला, तरी घरांमध्ये चिखल साचलेले असून, त्यात साप, विंचू निघत असल्यामुळे नागरिकांवर निर्वासित होण्याची वेळ आली आहे. मिळेल तिथे आसरा घेऊन नागरिक एक-एक दिवस काढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. महापालिकेच्या अधिकारी संघटनेनेही पुढाकार घेतला आहे. संघटनेतर्फे 11 लाख रुपये आणि नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पाच लाख रुपये अशी 16 लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना केली जाणार आहे. सोमवारी (ता. 12) महापौर नंदकुमार घोडेले यांनी मदतीसंदर्भात बैठक घेतली. मदतीचा धनादेश 19 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्याकडे दिला जाणार आहे. 
 
मदत निधीसाठी  ठेवणार पेटी 
16 लाख रुपये देण्याचा निर्णय झाला असला, तरी त्यात वाढ करण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयासह प्रभाग कार्यालयांत मदत निधी पेटी ठेवली जाणार आहे. त्यात जमा होणारा निधीदेखील पूरग्रस्तांसाठी दिला जाणार असल्याचे महापौरांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AMC help to flood victims