महापालिका-महावितरणमध्ये नवा कलगी-तुरा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - महापालिका आणि महावितरणमध्ये वीजबिलावरून चांगलाच कलगी-तुरा रंगत आहे. पथदिवे सुरू करण्यासाठी वीजबिलाचा आग्रह धरणाऱ्या महावितरणला धडा शिकवण्यासाठी महापलिकेने मंगळवारी (ता. सात) रातोरात सर्वेक्षण केले व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 400; तर महापालिकेच्या जागेवरच असलेल्या 235 डी. पी. (विद्युत रोहित्र) शोधून काढल्या. एवढ्यावरच न थांबता त्या काढून घेण्यासाठी महावितरणला नोटीस बजावण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून महावितरण आणि महानगरपालिका यांच्यामध्ये कुरघोडी करण्याचा प्रकार सुरू आहे. गेल्या शुक्रवारी (ता. तीन) वीजबिल थकल्याने महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला. शहरात चार दिवस रस्त्यावर अंधार होता. पथदिव्याचा विषय बाजूला पडत नाही, तोच पाणीपुरवठ्याचे थकीत वीजबिल भरण्याचीही महापालिकेला नोटीस बजावण्यात आल्याने पित्त खवळलेल्या महापालिका प्रशासनाने मंगळवारी (ता. सात) डीपीच्या मालमत्ता कराचे सुमारे अडीच कोटी रुपये भरण्याबाबत नोटीस बजावली आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या डीपीचे सर्वेक्षण करण्याचे इमारत निरीक्षकांना आदेश देण्यात आले. त्यानुसार सहा इमारत निरीक्षकांनी अन्य कर्मचाऱ्यांना मदतीला घेऊन रात्रीतून सर्वेक्षण पूर्ण करून बुधवारी (ता. आठ) आयुक्‍तांना अहवाल दिला. या आधारे महावितरणला वाहतुकीला अडथळा ठरणारे डीपी काढून घेण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: amc & mseb issue