बीटकॉईन प्रकरण; अमीत भारद्वाज नांदेड पोलिसांच्या ताब्यात

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 10 मे 2018

नांदेड :  नांदेड शहरात बीटकॉईन या आभासी चलनाच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणारा अमीत भारद्वाज आणि हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड पोलिसांनी बुधवारी (ता. 9) रात्री ताब्यात घेतले. 

नांदेड :  नांदेड शहरात बीटकॉईन या आभासी चलनाच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणारा अमीत भारद्वाज आणि हेमंत सूर्यवंशी या दोघांना नांदेड पोलिसांनी बुधवारी (ता. 9) रात्री ताब्यात घेतले. 

विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बीटकॉईन प्रकरणाचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगताप आणि एपीआय एस. वाय धुमाळ यांच्या पथकांनी पुणे येथून अमीत भारद्वाज व हेमंत सुर्यवंशी यांना ताब्यात घेतले आहे. गुरूवारी (ता. 10) सायंकाळी नांदेड न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे एपीआय धुमाळे यांनी सांगितले. या प्रकरणात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाती एका प्राध्यापकाला 65 लाखाचा फटका बसला आहे.  

Web Title: amit bhardwaj arrested by police for bitcoin matter