esakal | अमित देशमुख यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह, ट्विटरवरून दिली लातूरकरांना माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

latur news

लातूर : मला काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. ताप, खोकलाही आला होता. ही लक्षणे पाहून मी तातडीने डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी ‘कोरोना’ची तपासणी करण्यास सांगितले. या तपासणीत मी कोरोना निगेटीव्ह असल्याचे आढळून आले. सध्या मी पूर्ण बरा आहे. काळजी करू नका, अशी माहिती पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ट्विटरवरून लातूरकरांना बुधवारी दिली.

अमित देशमुख यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह, ट्विटरवरून दिली लातूरकरांना माहिती

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : मला काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. ताप, खोकलाही आला होता. ही लक्षणे पाहून मी तातडीने डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी ‘कोरोना’ची तपासणी करण्यास सांगितले. या तपासणीत मी कोरोना निगेटीव्ह असल्याचे आढळून आले. सध्या मी पूर्ण बरा आहे. काळजी करू नका, अशी माहिती पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ट्विटरवरून लातूरकरांना बुधवारी दिली.

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही ‘कोरोना’च्या रूग्णात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेकडून वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. गर्दी टाळता यावी म्हणून सरकारने संचारबंदी जाहीर केली. अशा स्थितीत लातूरकरांना कुठल्याही अडचणींचा सामना करण्याची वेळ येऊ नये म्हणून देशमुख हे मुंबईतून लातूरात लक्ष ठेवत आहेत. 

सद्यस्थितीत लातूरात कोणकोणती पावले उचलणे गरजेचे आहे,  शेतकऱ्यांचे-मजूरांचे हाल कसे कमी करता येईल अशा अनेक बाबींबाबत देशमुख यांनी लातूरातील प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. शहरातील ‘कोरोना’बाबतच्या दैनंदिन घडामोडींवरही त्यांचे बारीक लक्ष आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याचा माध्यमातून देशमुख हे वेगवेगळे निर्णय घेताना दिसत आहे. याबाबतची माहिती ते आपल्या सोशल मीडियावरून देत आहेत. त्यातच त्यांनी ‘मी आजारी होतो’, अशी माहिती बुधवारी (ता. ८) ट्विटरवरून दिली. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

कोरोना झालेल्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येतात. यापैकी ताप आणि खोकला ही लक्षणे आढळून आल्याने मी मुंबईतील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेलो. वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्या टीमने माझी ‘कोरोना’ तपासणी केली. त्यात मी कोरोना निगेटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मी सध्या पूर्णपणे ठिक आहे. माझी काळजी करू नये, असे ट्विट त्यांनी केले.

loading image