अमित देशमुख म्हणाले, माझ्या प्रिय भावा रितेश वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ई सकाळ टीम
Thursday, 17 December 2020

अभिनेता व लातूरकर रितेश देशमुख यांचा आज गुरुवारी (ता.१७) वाढदिवस आहे.

लातूर : अभिनेता व लातूरकर रितेश देशमुख यांचा आज गुरुवारी (ता.१७) वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांचे बंधू तथा राज्याचे सांस्कृतिक कामकाज मंत्री अमित देशमुख व आमदार धीरज देशमुख यांनी रितेश यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या प्रिय भावा रितेश देशमुख तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो. तुझं असणे हे अद्वितीय आहे. देव तुला आशीर्वाद देवो या शब्दांमध्ये अमित देशमुख यांनी सोशल मीडियावरुन रितेश यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

दादा, आज तुझा वाढदिवस आहे. तू नेहमी माझ्या आयुष्यातील चढ-उताराच्या वेळेस सोबत असतो. काही वेळेस तू मला तुझ्या खांद्यावर उचलून घेतले आहे. यातून मी तुझा लहान भाव असल्याचे इतरांनी पाहिले आहे. एक लहान भाऊ म्हणून जे तू तुझ्या आयुष्यात यश मिळविले आहे. विशेषतः जसे तू लोकांना अनुभूती देतो त्याचा मला अभिमान वाटत असतो. असा स्वभाव पपांमध्ये होतो जो तुझ्यात आहे. तुला खूप सारे प्रेम, आनंददायी वाढदिवस रितेश देशमुख, या शद्बांत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी आपल्याला भावाला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Deshmukh, Dhiraj Deshmukh Greet Ritesh For Birthday Latur