नांदेडला अमितसिंह तेहरा झाले सभापती

फोटो
फोटो

नांदेड - नांदेड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉँग्रेसचे नगरसेवक अमितसिंह तेहरा यांची गुरुवारी (ता. २६) बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अनेकांनी केले स्वागत
निवडीच्या वेळी प्रभारी नगरसचिव अजितपालसिंघ संधू, उपायुक्त सुधीर इंगोले, विलास भोसीकर यांच्यासह महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि स्थायी समितीच्या सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. सभापतीपदी निवड केल्याबद्दल श्री. तेहरा यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अमिता चव्हाण, डी. पी. सावंत, अमर राजूरकर, मोहन हंबर्डे यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत. 

स्वच्छ, सुंदर शहर करणार
नांदेड शहराची ओळख जगभरात असून हे शहर स्वच्छ आणि सुंदर रहावे, यासाठी आपण विशेष लक्ष देणार असल्याचे सांगून सभापती श्री. तेहरा म्हणाले की, शहर वाहतुक सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाची मदत घेण्यात येणार आहे. रस्ते दुभाजक आणि फूटपाथ यांचे सौंदर्यीकरण करण्याचा मानस आहे. तसेच हॉकर्स झोनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 
येथे क्लीक करा...नांदेडच्या ‘या’ उपक्रमाने रोवला देशपातळीवर झेंडा

तेहरांना मिळाली कार्याची पावती
कॉँग्रेस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत नेहमीच तेहरा कुटुंबीय राहिले आहे. तेहरा कुटुंबीयांत मागील काळात मुन्नासिंह तेहरा यांनी नगरसेवक तसेच स्थायी समितीचे सभापती म्हणूनही दोनदा काम पाहिले आहे. त्यानंतर अमितसिंह तेहरा यांच्या पत्नी अनुजा तेहरा यांनी देखील स्थायी समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. विशेष म्हणजे महापालिकेतील पहिल्या स्थायी समितीच्या महिला सभापती होण्याचा मान त्यांना मिळाला. आता अमितसिंह तेहरा यांना सभापतिपद मिळाले आहे. तेहरा कुटुंबीयांनी केलेल्या चांगल्या कार्याची ही पावती आहे. 


राज्य सरकारकडून निधी आणणार
मागील भाजप सरकारच्या काळात महापालिकेला निधी कमी मिळाला. आता महाआघाडीचे सरकार राज्यात असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून महापालिकेला विकासकामांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी देखील आपण नागरिकांना वेळेवर कर भरण्याचे आवाहन करणार आहोत. जेणेकरुन चांगल्या पद्धतीने विकासकामे करता येतील.
अमितसिंह तेहरा, सभापती, स्थायी समिती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com