
छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्याचा आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांनी मध्यरात्री एन्काउंटर केला. आता अमोल खोतकरच्या कुटुंबियांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनीच पैसे घेऊन आपल्या मुलाचा खून केल्याचा आरोप अमोलच्या वडिलांनी केला आहे.