संशयितांची चौकशी सुरूच; पोलिसांना धागेदोरे मिळेना 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

औरंगाबाद - अमोल साबळे खून प्रकरणात पोलिसांकडून संशयितांची कसून चौकशी सुरूच आहे. मात्र अद्याप धागेदोरे पोलिसांना मिळाले नाहीत. यापूर्वीच्या कंपनीत साबळे यांनी अनेकांच्या रक्कमा गुंतवल्याचे समोर आले, ती कंपनीच बंद झाल्याचे आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

अमोल साबळे या मार्केटिंग प्रतिनिधीचा कटरने गळा चिरून खून करण्यात आला होता. ही आत्महत्या भासविण्यासाठी त्यांचा मृतदेह रेल्वेरुळावर टाकला. शुक्रवारी हा प्रकार उघड झाला. अमोलच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, चौघांवर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांचे जबाब घेतले असून, संशयितांची चौकशी सुरू आहे. अमोल साबळे यापूर्वी नगरस्थित कंपनीत कामाला होते. कंपनीत असताना काही गुंतवणूकदारांशी त्यांचे व्यावसायिक संबंध होते. यातूनच साबळे यांनी त्यांच्या रकमा कंपनीत गुंतवल्या. पण कालांतराने कंपनी बंद पडली. परिणामी गुंतवणूकदारांनी अमोल साबळे यांच्याकडे रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या व्यवहारातून त्यांचा खून झाला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चिकलठाणा पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकामार्फत तपास केला जात आहे. 

Web Title: amol sable murder case