हिंगोलीत सर्वोत्कृष्ट आशांचा आनंदीबाई जोशी पूरस्काराने गौरव, वसमत अव्वल तर हिंगोली द्वितीय

राजेश दारव्हेकर
Wednesday, 3 February 2021

जिल्हास्तरीय पुरस्कारात कुरुंदा प्राथमिक केंद्राच्या नीता भारत गायकवाड या अव्वल ठरल्या आहेत.

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारातून उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आशांना बुधवारी ( ता. ३ ) जिल्हा, तालुकास्तरीय आशा स्वयंसेविका पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय पुरस्कारात कुरुंदा प्राथमिक केंद्राच्या नीता भारत गायकवाड या अव्वल ठरल्या आहेत.

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात बुधवारी आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांना डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार तर उत्कृष्ट काम करणाऱ्या  प्राथमिक केंद्रांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, विठ्ठल चौतमल, संजय देशमुख, बाळासाहेब मगर, अंकुश आहेर,सीईओ राधाबीनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा नांदेड पोलिस दलातील कोरोना योद्ध्याच्या कुटुंबीयांना साठ लाखाचा धनादेश- पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे

सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकामध्ये कुरुंदा येथील नीता गायकवाड प्रथम, भांडेगाव येथील भाग्यरथा शिखरे यांना द्वितीय पुरस्कार मिळाला, तर आरोग्य सखी जिल्हास्तरीय पुरस्कारमध्ये हिंगोली तालुक्यातील सिरसम केंद्रांतर्गत कनका येथील नंदाबाई कांबळे प्रथम, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील सरस्वती अंभोरे यांना द्वितीय पुरस्कार देण्यात आला. तसेच गट प्रवर्तकमधून इसापुर येथील स्वाती जगताप प्रथम, कुरुंदा येथील पंचशीला द्वितीय, अर्चना धामणकर तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय तालुकास्तरावर दहा आशाना  पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर २४ आशा स्वयंसेविकाना डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.सहा संस्थांना कायाकल्प तर सात संस्थांना डॉ. आनंदीबाई जोशी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

वसमत येथील महिला रुग्णालयाला राज्यस्तरीय एक लाख रुपयांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यानंतर ग्रामीण रुग्णालय सेनगाव राज्यस्तरीय एक लाख रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र पांगरा शिंदे, जिल्हास्तरीय प्रथम दोन लाख, पोतरा आरोग्य केंद्र जिल्हास्तरीय उत्कृष्ट पन्नास हजार, भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हास्तरीय उत्कृष्ट पन्नास हजार, गोरेगाव जिल्हास्तरीय उत्कृष्ट पन्नास हजार ही रक्कम राज्यस्तरावरून वर्ग केले जाणार आहे. 

येथे क्लिक करामी सर्वसामान्य कार्यकर्ताच; सत्कार नको कामे सांगा- आमदार केराम

सात संस्थांना डॉ.आनंदीबाई जोशी जिल्हास्तरीय  पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, यामध्ये सेनगाव तालुक्यातील उपकेंद्र वरुड चक्रपान अंतर्गत येणाऱ्या कवठा केंद्राला प्रथम १५ हजार तर हिंगोली तालुक्यातील उपकेंद्र डिग्रस कऱ्हाळे येथील नरसी केंद्राला द्वितीय दहा हजार, तृतीय उपकेंद्र जामगव्हाण अंतर्गत  पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्राला पाच हजार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळदरी प्रथम २५ हजार, प्राथमिक आरोग्य केंद्र पोतरा द्वितीय १५ हजार, प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा तृतीय दहा हजार ,ग्रामीण रुग्णालय औंढा प्रथम पन्नास हजार पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. सतीश रूनवाल यांनी केले शंकर तावडे यांनी आभार मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anandibai Joshi Award for Best Hope in Hingoli, Wasmat Top and Hingoli Second hingoli news