देशातील सर्व समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करा : आनंदराज आंबेडकर

anandraj ambedkar
anandraj ambedkar

नांदेड : देशातील सर्व समाजाला राजकिय आरक्षण रद्द करा, राजकिय आरक्षणाने निवडून गेलेले लोक पक्षाचे  आणि मतदारांचे प्रतिनिधी असतात. त्यांच्यामुळे समाजाचे काही भले होत नाही. डॉ. आंबेडकरांनाही हेच अपेक्षीत होतं. असे मत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी नांदेडात व्यक्त केले.

रिपब्लीकन सेनेच्या वतीने नांदेड योथे मराठवाडा स्तरीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आनंदराज आंबेडकर गुरूवारी (ता. 4) नांदेड दौऱ्यावर होते. यावेळी शासकिय विश्रागृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. इंदू मीलच्या बाबतीत साडेबारा एकरवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे व पुतळ्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. कृती आराखड्यात पुतळ्याची साडेतीनशे फुट उंची असतांना ती अडीचशे फुटावर आणण्यात आली, मात्र खर्च वाढविण्यात आला. यामागचं नेमक गमक काय हे विचारण्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. तर तिकडे छित्रपती शिवाजी महाराज आणि गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांची उंची कायम ठेवली. हा नियम डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यालाच का असा सवाल त्यांनी केला.

पुतळा सरकारला करता येत नसेल तर आंबेडकरी जनतेच्या ताब्यात दिला तर स्वखर्चाने आम्ही उभारु असेही आंबेडकर म्हणाले. तसेच येणाऱ्या निवडणूकांसाठी रिपब्लिकन सेनेचे वंचीत बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकार हे संविधान विरोधी असून संविधानाला विरोध करणारे आमचे शस्त्रु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 2019 च्या निवडणूका ही परिवर्तनाची नांदी असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीपती ढोले, संजीव बोधनकर, माधव जमधाडे, डी. डी. वाघमारे यांची उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com