अन् टॉवरवरच जागून काढली रात्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथील विकासकामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएल कंपनीच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने आंदोलकांनी मंगळवारी (ता. ६) टॉवरवर रात्र जागून काढली.

सकाळ वृत्तसेवा ः मंगेश शेवाळकर

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथील विकासकामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएल कंपनीच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने आंदोलकांनी मंगळवारी (ता.६) टॉवरवर रात्र जागून काढली.

सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सन 2013 ते सन 2019 पर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, गावातील सांडपाण्याचा प्रश्न सोडवावा, प्रत्येक प्रभागांत विद्युत पोल उभारणी करून पथदिवे बसवावेत, नादुरुस्त विद्युत पोल बदलून द्यावेत, स्वच्छतागृह बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना तातडीने अनुदान द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अॅड. विजय राऊत, मारुती कोरडे, रवी बांगर, विलास आघाव, भारत कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पदाधिकारी नजीर शहा, मोबीन शहा, अनिल मानेकर, शिवाजी तुरे, किशोर सुलताने, सिताराम सातपुते, अशोक डांगे, साबेर शहा, शबिर शहा, सूनील घनतोडे, यांनी गावातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. 

त्यानंतर सेनगावचे गटविकास अधिकारी किशोर काळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन अहवाल दिला. मात्र हा अहवाल चुकीचा असल्याचे सांगत आंदोलकांनी अहवाल घेण्यास नकार दिला. रात्रीपर्यंत कोणीही अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आल्याने रात्री आंदोलन सुरू होते आंदोलनकर्त्यांनी रात्र जागून काढली. यावेळी गावकरी व पोलीस कर्मचारी हजर होते. या प्रकारणात आज काय होणार याकडे गावकर्‍यांची लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And they spent the full night on the tower

फोटो गॅलरी