संतप्त महिलांनी उखडून फेकला विकास कामाचा फलक

माधव इतबारे
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद : रस्त्याचे काम न करता फक्त लोकार्पणाचा फलक लावण्यात आल्याने संतप्त झालेल्या जय बजरंगनगर येथील महिलांनी मंगळवारी (ता.26) सकाळी सूतगिरणी चौकात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी नगरसेविकेने लावलेला लोकार्पणाचा फलकही उकडून फेकण्यात आला.

औरंगाबाद : रस्त्याचे काम न करता फक्त लोकार्पणाचा फलक लावण्यात आल्याने संतप्त झालेल्या जय बजरंगनगर येथील महिलांनी मंगळवारी (ता.26) सकाळी सूतगिरणी चौकात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी नगरसेविकेने लावलेला लोकार्पणाचा फलकही उकडून फेकण्यात आला.

गारखेडा परिसरात सूतगिरणीच्या पाठीमागे जय बजरंगनगर ही जुनी वसाहत आहे. मात्र अद्याप या भागात रस्ते पाणी ड्रेनेज या समस्या आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम करावे, अशी मागणी नागरिकांनी नगरसेविका सीमा चक्रनारायण यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विकास निधीतून रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचा बोर्ड लावला. मात्र प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.

गेल्या काही दिवसापासून पाऊस होत असल्यामुळे या भागात सर्वत्र चिखल झाला झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे. सोमवारी (ता. 25) चिखलात महिला पडल्याने संतप्त झालेले नागरिक सकाळी रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्त्याचे काम न करताच नगरसेविकेने लावलेला लोकार्पणाचा फलक उखडून फेकून दिला. त्यानंतर सर्व महिला सूतगिरणी चौकात आल्या. रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. महिला रस्त्यावर उतरल्या नंतरही नगरसेविका किंवा महापालिका अधिकारी या भागाकडे फिरकले नाही. त्यामुळे महिलांनी वॉर्ड कार्यालयावर धाव घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात चंद्रकलाबाई नरवाडे , मायाबाई निकाळजे, संताबाई मानकरी, बाबासाहेब भंडारे, कांताबाई डोळस,  सुनिता आढागळे, जनाबाई सदावर्ते, छाया खंदारे, यांच्यासह महिलांनी सहभाग घेतला होता.

Web Title: angry women removed poster of development work